वरोरा - दि. 8/03/2021 रोजी पो स्टे वरोरा हद्दीत दोन ठिकाणी प्रॉव्हि रेड कारवाही केली असता रेड क्र (1) मध्ये प्रोवी पेट्रोलिंग करीत असता पोलिस स्टेशन चे फोनद्वारे माहिती मिळाली की नागपूर चंद्रपूर हायवे रोडवरील मालू पेट्रोलपंप जवळ दोन वाहनात अपघात झाला असून त्या वाहनांपैकी एका वाहनात दारू आहे अशी माहिती मिळाली असता तात्काळ घटनास्थळी पोहचून पाहणी करून चौकशी केली मारुती सुझुकी क्र mh 12 e g 1039 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहनात अवैधरित्या देशी दारू बाळगून निष्काळजीपणे व हयगयीने चालवून होंडा अमेज कार क्र MH 34 AM 2751 ला ठोस मारून अपघात केला त्यादरम्यान अपघातग्रस्त वाहन क्र MH 12 EG 1039 ची वाहनाची प्रोविबाबत झडती घेतली असता गाडीमध्ये एकूण 68 नग खाकी खरड्याचे खोक्यात प्रत्येकी 90 ml देशी दारूने रॉकेट संत्रा कंपनीच्या 6800 नग शीश्या की 6,80,000 व वाहन की 5,00,000 रु व एक मोबाईल की 1000 रु असा एकूण 11,81,000 रु चा मुद्देमाल मिळून आला असून MH 12 EG 1039 चा फरार आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तसेच रेड क्र (2) मध्ये गोपनीय माहितीच्या आधारे आष्टी गावाकडे जाणाऱ्या कॅनाल रोडवर प्रोविरेड कारवाही केली असता रेड दरम्यान HONDA ACTIVA क्र MH34BL 0956 वर 12 पेट्या ( 1200 शिष्या) 90 मिलिने भरलेल्या की 120000 व वाहन की 60,000 रु असा एकूण 1,80,000 रु चा माल मिळून आला व आरोपी जाकीर अजीज शेख, सलमान उर्फ सोनू पठाण हे दोन्ही फरार झाल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाही मा. श्री. अरविंद साळवे , पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. श्री प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. श्री. निलेश पांडे , उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा, यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक दिपक खोब्रागडे पो. स्टे. वरोरा व सपोनि निलेश चवरे यांचे अधिपत्यात पोउपनी सर्वेश बेलसरे, सफो विलास बलकी, पोहवा राजेश वराडे , रणधीर मेश्राम, नापोशी दिलीप सूर, किशोर बोढे, पोशी कपिल भांडारवार, पोशी सुरज मेश्राम, पोशी विशाल गीमेकर, पोशी दिनेश मेश्राम, पोशी महेश बोलगोडवार यांनी पार पाडली.
