गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील नांदाफाटा परिसरात मागील ३ वर्षांपासून मोठ्याप्रमाणात सट्टापट्टीचा व्यवसाय सुरू आहे. पोलीस अधिकारी यांच्या नजरेआड सदर अवैध व्यवसाय सुरू असल्याचे बोलले जात असून सध्याच्या परिस्थीतीत याठिकाणी एक "अण्णा" नामक व्यक्ती येथील एका घरात सट्टापट्टीचा व्यवसाय करीत होता."नांदाफाटा येथे "अण्णा" बनला सट्टा किंग" या मथळ्याखाली दोन दिवसापुर्वीच News34 ने सविस्तर बातमी प्रकाशित केली होती. कदाचित याचीच दखल घेत गडचांदूर येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी "सुशील कुमार नायक" यांनी नांदाफाटा येथे ८ मार्च रोजी त्याठिकाणी धाड टाकून सट्टा किंग अण्णासह तब्बल 11 व्यक्तींना 28 हजारांच्या मुद्देमालासह अटक केल्याची माहिती आहे.सध्या गडचांदूर पोलीस स्टेशन येथे यासंबंधीची कारवाई सुरू असल्याची माहिती असून हा "News34 च्या बातमीचा असर" अशी चर्चा ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे. सदर कारवाई बद्दल एसडीपीओ नायक यांचे कौतुक होत असून आता "खलनायकांनी खबरदारी घ्यावी, नायक आले एक्शन मोडवर" असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
