चंद्रपूर - जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर आदिवासी समाजाने भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा स्थापित केला होता, मात्र उदघाटनाच्या पूर्वीच महानगर प्रशासनाने कुणालाही पूर्वसूचना न देता हटविला.
प्रशासनाच्या या कारवाईमुळे आदिवासी समाज प्रचंड नाराज झाला आहे, भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा त्या ठिकाणी महानगर प्रशासनाने मानवंदना देत पुन्हा उभारावा यासाठी आदिवासी समाजाने बेमुदत बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.
जर प्रशासनाने मागणी पूर्ण केली नाही तर आदिवासी समाजाचा जनाक्रोशाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने तयार रहावे असा इशारा सुद्धा आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
