चंद्रपूर - जिल्ह्याच्या अवैध दारूच्या धंद्यात अमित चे वर्चस्व संपल्यावर आता या धंद्यात नवा गडी नवा डाव सुरू झाला असून विशाल ला हे काम मिळाले आहे.
अवैध दारूच्या धंद्यात विशाल चे हे पहिले पाऊल असून याची सुरुवात त्याने दुर्गापूर क्षेत्रापासून सुरू केली आहे.
जिल्ह्यात अवैध दारूचा होलसेल व्यापार करण्याकरिता अजून विशाल ची बैठक झाली नसली तरी सध्या दुर्गापुरात रोज 100 पेट्यांची डिलिव्हरी सुरू झाली आहे.
विविध क्षेत्रात नाम कमविल्यानंतर आता अवैध दारूच्या धंद्यात विशाल च पदार्पण झाले असून त्याला अवैध धंदे करणाऱ्यांची चांगलीच साथ मिळाली आहे.
दुर्गापुरात आधीच अवैध दारू, सट्टा पट्टी असे व्यवसाय जोमात सुरू असून आता दारूच्या चिल्लर व्यापाऱ्यांना विशाल तर्फे ठोक माल मिळणार असल्याने चिल्लर विक्रेत्यांमध्ये आनंदाच वातावरण निर्माण झाले.
काही महिन्यांपूर्वी ताडी पिऊन एकाचा मृत्यू दुर्गापूर क्षेत्रात झाला होता, त्यानंतर मृतकांच्या नातेवाईकांनी त्या ताडी विक्रेत्यांच्या घरी जात तोडफोड केली, मात्र अण्णा नामक ताडी विक्रेत्याला त्याच्या धंद्यात कुणाची साथ होती ? त्यामध्ये पोलिसांची भूमिका काय हे न सांगून सुद्धा सामान्य नागरिकांना समजणारचं.
जिल्ह्यात अवैध दारूविक्री थांबावी यासाठी कुणी प्रयत्न करीत नाही मात्र अवैध दारू धंदा कोणत्या क्षेत्रात सुरू करायचा याची मात्र नेहमी होड लागत असते.
