चंद्रपूर - शहरातील मुक्ती कॉलनी परिसरात 2 महिलांना अमानुषपणे पावडा व हातोडीने प्रहार करीत मारहाण करण्यात आली, आज घटनेला 4 दिवस उलटले असताना सुद्धा पोलिसांनी पीडित महिलांच बयान सुद्धा नोंदविले नाही.
गिरीश बोन्डे यांचा प्लॉट असून त्या जागेवर बांधकाम करण्याचे काम सुरू आहे, 19 मार्चला त्या प्लॉटजवळ विटा उतरविण्यात आला मात्र बाजूला राहत असणाऱ्या मीना व मौसमी बिश्वास यांनी तुम्ही इथे कशाला बांधकाम करीत आहे, ह्या विटा इथे टाकू नका असे सांगत शिवीगाळ करीत वाद सुरू केला. त्या दोघी इतक्यावरच थांबल्या नाहीतर त्यांनी आपल्या भावाला कॉल करीत त्या ठिकाणी बोलाविले सतीश व सुजित रॉय यांनी तिथे येत झगडा करू लागले.
मध्यस्थी म्हणून प्लॉट धारक गिरीश बोन्डे यांची पत्नी रीमा बोन्डे, सासू दीपिका बिश्वास व सासरे रवींद्र बिश्वास यांनी रॉय बंधूंना वाद का घालत आहे म्हणून विचारणा केली मात्र त्या ठिकाणी पावडा व हातोडी उचलत रॉय बंधूनी रीमा व दीपिका बिश्वास यांच्या डोक्यावर प्रहार केला, दीपिका बिश्वास ह्या जागीच बेशुद्ध पडल्या तर रीमाला रॉय बंधूनी जमिनीवर पाडत मारहाण करू लागले, रॉय बंधू इतक्यावरचं न थांबता रिमाचे कपडे फाडले व मारहाण करू लागले.
नागरिकांनी हा वाद सोडविला, रक्तबंबाळ अवस्थेत रीमा व दीपिका बिश्वास ह्या रामनगर पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्या मात्र गंभीर जखमी असल्याने दोघांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. 
मात्र आज 4 दिवस उलटल्यावर सुद्धा रामनगर पोलिसांनी त्या दोघांचे साधं बयाण तर सोडा पोलिसांनी त्यांना ढुंकून सुद्धा बघितले नाही.
पीडित रीमा बोन्डे व दीपिका बिश्वास यांनी आम्हाला न्याय हवा, पोलीस प्रशासन आमचं ऐकत नसल्याचा आरोप सुद्धा केला आहे.
विशेष म्हणजे घटनेच्या 1 दिवस आधी 17 मार्चला रवींद्र बिश्वास यांनी मीना बिश्वास यांचे विरोधात रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती, आमचा प्लॉट मीना बिश्वास हडपण्यासाठी आमच्यावर दबाव आणत, शिवीगाळ व मारण्याची धमकी देत आहे.
पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली असती तर ह्या वादात रीमा व दीपिका बिश्वास यांची आज अशी अवस्था झाली नसती.
या प्रकरणी जिल्ह्यात नव्याने गठीत झालेल्या नारी शक्ती संघटनेच्या मध्यस्ती नंतर पोलीस विभागाने हालचाली सुरू केल्या आहे.
यावेळी नारी शक्ती संघटनेच्या अध्यक्षा सुनीता गायकवाड व अलका मेश्राम उपस्थित होते.
