चंद्रपूर - जिवती तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या रस्त्याचे व पुलाचे काम हे वनविभागाच्या परवानगी शिवाय सुरू असून सर्व नियम हे कंत्राटदार मार्फत पायदळी तुडविल्या जात आहे.
तालुक्यात ग्रामपंचायत अंतर्गत जरी कामे करायची असेल ती वनविभागाच्या ना हरकत परवानगी शिवाय सुरू करता येत नाही मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग धनदांडग्या कंत्राटदारांच्या बाजूने असल्याने सर्व नियम धाब्यावर बसवीत आहे याकरिता शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात युवा सेना जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे, राहुल विरुटकर, गणेश ठाकूर व जसणीक जब्बाल यांनी मुख्य वनसंरक्षक यांना भेटत सदर कामे ही तात्काळ बंद करून रीतसर वनविभागाच्या परवानगी मार्फत सुरू करावे अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.
