चंद्रपूर - राज्यात पहिल्यांदाच मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली त्यात चांगलं यश सुद्धा मिळालं, चंद्रपूर जिल्ह्यात मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या झंझावताने मनसेला ग्रामपंचायत निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे जास्त यश मिळाले.
शहरी भागा प्रमाणे ग्रामीण भागातील जनता सुध्दा मनसेचे ध्येय धोरण व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करत असलेल्या कामांमुळे मनसे कडे वळत आहे.
हिंदू जननायक मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनि प्रेरित होऊन मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात माजरी,पाटाळा,कुचना येथिल विविध पक्षातील लोकांचा मनसे मध्ये प्रवेश यावेळी मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चांदनखेडे, मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, मनवीसे शहर अध्यक्ष नितीन पेंदाम, ग्रामपंचायत सदस्य निशिकांत पिसे,तालुका सचिव करण नायर उपस्थित होते.