नागभीड - दि.25/03/2021 रोजी किटाळी बोर पाणीपुरवठा योजनेचे चे विज बिल भरले की नाही हे विचारण्यास गेले असता- महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ मंगेश कानूजी सैजारे व त्यांचे सहकारी गौरव गिरीधर गौरकार, दिलिप किसन गेडाम यांना सरपंच छगन कोलते यांनी दुपारी 1.30ते 3.00वाजेपर्यंत डांबून ठेवले. पाणीपुरवठयाचे वीज बिल का भरले नाही विचारले असता,भरणा तुमचे वरिष्ठ अधिकारी ग्रामपंचायत येथे आल्याशिवाय वीजबिल भरणार नाही असे म्हणत सरपंच यांनी वीज पुरावठा खंडित करू न देता दरवाजा दीड वाजता बंद करून सैजारे व सहकाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालय किटाळी येथे बाहेरून कुलूप लावले. याची माहिती त्यांनी सहाय्यक अभियंता वीज वितरण केंद्र तळोधी यांना फोनद्वारे दिली. त्यानंतर 3 वाजता सहाय्यक अभियंता हे पोलीस स्टेशन नागभीड येथील कर्मचाऱ्यांना घेऊन पोहोचल्यानंतर सरपंच यांनी दरवाज्याचे कुलूप उघडले व त्यांची सुटका झाली. यासंदर्भात पोलीस स्टेशन नागभीड येथे सरकारी कामात अडथळा व हेतूपूरस्सरपणे डांबून ठेवणे या कलमाखाली भादवी चे कलम 186,342 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
