प्रतिनिधी/सैय्यद मुमताज अली
नांदाफाटा - समाज क्रांतीचे प्रणेते संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली . सम्पूर्ण भारत देशात समानतेची शिकवण देऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचें महान कार्य ज्या महामानवाने केले अश्या महापुरुषाची जयंतीला कोरोनाच्या पार्श्वभूमी लक्षता घेऊन थोडक्यात स्वरुप देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सतिशजी लांडे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिबी गावचे उपसरपंच आशिष देरकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजाचे जेष्ठ नागरिक आनंदरावजी लांडे, मरोतीजी बुडे, भोलाजी खंडाळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलासजी टिकले, जीवनजी बचाशंकर , कवडुजी टिकले, रामभाऊ धुळे , पारस वाढई,अरविंद इंगोले ,प्रकाश शिवणकर, वासुदेव पंचवटे, नितीन येरेकर, पंकज पवार, व मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले . संचालन गोकुल बन्सोड यांनी केले तर आभारप्रदर्शन हरीश खंडाळे यांनी व्यक्त केले.
