चंद्रपूर - महिला दिनाचे औचित्य साधून महिलांद्वारे महाकृषी उर्जा धोरण 2020 अभियान- अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कृषी ऊर्जापर्व अंतर्गत- वीजबिल भरण्यासंबंधी जनजागृती होण्यास, उर्जास्त्रोतांचे संवर्धन,सौर कृषिपम्पाच्या माध्यमातून वीज,महाकृषीउर्जा धोरण 2020 च्या माध्यमातूनच म्हणजेच षेतकरी बांधवांना सुधारीत थकबाकीवर व्याज व दंड माफ होवून थकबाकीमुक्त होण्याच्या योजनेबददल जनजागृती, वीज सुरक्षा, उध्दीश्टांसह आज दिनांक 8 मार्च 2021 रोजी महिला दिनी महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देषपांडे यांच्या पुढाकाराने महावितरण चंद्रपूर परिमंडळाद्वारे महिलांच्या स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले. महावितरण मध्ये कार्यरत महिला शक्तीस अभिवादन करीत महिला दिनाच्या शुभेच्छा मुख्य अभियंता यांनी रॅलीस संबोधित करतांना दिल्या.
महावितरण मध्ये आपल्या कार्यातून स्त्रिशक्तीची जिद्द दाखविणाऱ्या महिला अधीकारी व कर्मचारी यांना महावितरणतर्फे अभिवादन करतो असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
महिलांद्वारा या स्कूटर रॅलीत, थकबाकीच्या समस्येवर ग्राहकांना आवाहन करून वीजबिल भरण्यासंबंधी याप्रसंगी आवाहन करण्यात आले.
चंद्रपूर मंडळाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे यांनी स्कूटर चालवित सदर रॅलीचे नेतृत्व करीत रॅलीची सुरुवात झाली. पुढे ही रॅली स्थानिक अंचलेश्वर गेट, गिरनार चैक, गांधी चैक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चैक, वाहतूक कार्यालय मार्गे महावितरणच्या उर्जानगर उपकेंद्रात संागता झाली झाली. कृषीउर्जापर्वानिमित्त साधून आज महावितरणमध्ये महिलांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत ठिककिाणी सत्कार करण्यात आला.
या रॅलीत महावितरणच्या महिला अभियंता, महिला अधिकारी व कर्मचारी यांनी उस्फुर्तपणे मोठया संख्येत स्कूटर चालवित सहभाग नोंदविला.
महावितरण कर्मचारी कला व क्रीडा मंडळ चंद्रपूर यांचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शविली. ही रॅली यषस्वीपणे पार पडण्यास महावितरण कर्मचारी कला व क्रीडा मंडळ चंद्रपूरचे पदाधिकारी श्री. अमित बिरमवार, बंडू कुरेकार, कु. रोहिणी ठकरे व उपकार्यकारी अभियंता (Gen) श्री विजय राठोड, आरती बागुलकर आदींनी विषेश परिश्रम घेतले.


