घुगूस - काही दिवसांपूर्वी DNR या ट्रॅव्हल्समध्ये एका तरुणीचे विनयभंग प्रकरण ताजे असतांना पुन्हा DNR च्या बलकर ट्रकने NSG कमांडो सचिन संभा निखाडे याला समोरून जोरदार धडक दिली, या धडकेत सचिन निखाडे व त्याचा मावस भाऊ तानाजी रोगे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली ज्यामुळे दोघांच्या उजव्या पायाची हड्डीचं तुटली.
NSG मानेसर, गुडगाव दिल्ली येथे कार्यरत सचिन निखाडे हे 40 दिवसांच्या सुट्टीवर कोरपना येथे आपल्या घरी आले होते.
24 फेब्रुवारीला ते काही कामानिमित्त भद्रावती ला गेले परत येत असताना धानोरा येथे एका दुचाकीला ओव्हरटेक करीत बलकर ट्रक क्रमांक MH 34 AB 4877 सचिन निखाडे यांच्या वाहन क्रमांक MH34 BP 4389 ला समोरून धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील दोघे बाजूला फेकल्या गेले, मात्र सचिन ने त्या ट्रकचा क्रमांक व ट्रर्कवरील DNR हे नोट करून ठेवले.
अचानक घडलेल्या या अपघातात परिसरातील नागरिकांनी तात्काळ दोघांना उचलत बाजूला ठेवले व सचिनच्या वडिलांना कॉल केला, यादरम्यान नागरिकांनी एम्ब्युलन्स ला पाचारण केले.
दोघांना तात्काळ चंद्रपूर शहरातील गाडेगोने हॉस्पिटलमध्ये दाखल केले, डॉक्टरांनी दोघांच्या पायाच्या नडगीचे हाड मोडले असल्याचे सांगितले.
पाय बरा होण्यासाठी बराच अवधी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले, मात्र 24 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंत झालेल्या अपघाताची पोलिसांनी साधी दखल सुद्धा घेतली नाही, 4 मार्चला सचिन व त्याचा मावस भाऊ तानाजी हे जखमी अवस्थेत घुगूस पोलीस स्टेशनला पोहचले व घडलेल्या अपघाताची तक्रार देत कठोर कारवाईची मागणी केली मात्र पोलिसांनी तो ट्रक दुसऱ्याचा आहे अशी बतावणी करीत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला.
सचिन समोर आता एकच प्रश्न पडला की मला NSG पुन्हा कामावर रुजू करणार का? DNR ट्रक मुळे पायाला झालेली दुखापत याला सर्वस्वी जबाबदार वाहनचालक व DNR ट्रक मालक आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, देशसेवा करणाऱ्यांने पोलीस तक्रार केल्यावर सुद्धा कारवाई नसेल होत तर सामान्य जनतेसोबत पोलीस कसे वागत असणार असा प्रश्न सचिनने यावेळी उपस्थित केला.
