चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात अभियांत्रिकी क्षेत्रात नावारूपास आलेले राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय तब्बल 4 दशकांपूर्वी देशाचे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ केली.
मात्र शांतारामजी गेले आणि नवीन व्यवस्थापन समितीने महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे हाल करून टाकले.
धक्कादायक बाब म्हणजे मागील 4 वर्षांपासून एकाही कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही, मागील 4 वर्षात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेत आपली सेवा सुरू ठेवली मात्र व्यवस्थापनाच्या निष्ठुरतेपणामुळे कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आला नाही. #News34
4 वर्षाच्या कालावधीत 2 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केल्या, व्यवस्थापनाने सध्या भविष्य निर्वाह निधीची प्रचंड थकबाकी, महागाई भत्ता न लावणे, नियमबाह्य पद्धतीने वेतनवाढ रोखणे, ईपीएफ ची रक्कम न भरणे, कर्मचाऱ्यांचे पत संस्था, बँक व एलआयसी चे पैसे वेळेवर न भरणे यासारखे प्रकार सुरू केले आहे.
वेतनाची मागणी केल्यास व्यवस्थापन सरळ कर्मचाऱ्यांना शो कास नोटीस जारी करण्याचे काम सध्या सुरू असून कर्मचाऱ्यांनी मागील 2 महिन्यापासून असहकार आंदोलन छेडले आहे.
मागील 2016 पासून अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तब्बल 250 कर्मचारी वेतनविना असून त्यांच्या पगाराची थकबाकी ही 50 कोटीच्या घरात पोहचली आहे.
कर्मचाऱ्यांच्या परिवारावर आज या व्यवस्थापनामुळे उपासमारीची पाळी आली आहे, ज्यावेळी ही संस्था नावलौकिक मिळवीत होती त्यावेळी मात्र व्यवस्थापनाने संस्थे मार्फत मिळालेले पैसे दुसरीकडे गुंतविण्याचे काम केले मात्र आज संस्थेला या लोकांनी पूर्णतः हवालदिल केले असा आरोप प्रा. राजेश ठोंबरे, धनंजय मेश्राम, देबनाथ तेलगोटे, महेंद्रसिंग बैस यांनी पत्रकार पत्रकार परिषदेत केला.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संस्था व्यवस्थापनाला थेट इशारा देत आवाहन दिलं की जर आपल्याकडून नियोजन होत नसेल तर खुर्च्या खाली करीत संस्था कर्मचाऱ्यांच्या हाती द्यावी आम्ही महाविद्यालय सुरळीत चालवून दाखवू.
