चंद्रपूर - राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-2020 जाहीर केले असून, त्याची अंमलबजावणी केली जात या धोरणाचे फायदे जास्तीत जास्त कृषी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभर दि.1 मार्च ते 14 एप्रिल 2021 पर्यंत राबविण्यात येत असलेल्या कृषी ऊर्जा पर्व अंतर्गत चंद्रपूर परिमंडळातील 14 हजार 711कृशिपंधारकानी थकबाकीमुक्तिची वाट धरली आहे. #News34
10 मार्च 2021पर्यंत एकून 14 हजार 711 कृषिपम्पधाकांनी एकूण 9 कोटी 49 लाखाचा भरणा करून थकबाकी मुक्त होण्याच्या दिषेने पाउुल टाकले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 10 हजार 527 कृषिग्राहकांनी 6 कोटी 96 लाख तर गडचिरोली जिल्ह्यातील 4 हजार 184 कृषिग्राहकांनी 2 कोटी 53 लाखाचा भरणा केला आहे.
थकबाकीमुक्त झालेल्या कृशिपंपधारकांपैकी एकंदरीत 3 हजार 561 कृषिपंप धारकांना थकबाकी मुक्त झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आली आहे. यात 308 महिलांचाही समावेष आहे.
महिला दिनाचे औचित्य साधून थकबाकीमुक्त झालेल्या महिलांचा सत्कार महिला दिनी करण्यात आला. चंद्रपूर मंडळातील 308 महिला कृशीपंपधारकांचा थकबाकीमुक्तिचे प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. चंद्रपुर विभागातील 118,वरोरा विभागातील 100 व बल्लारषा विभागातील 90 महिला कृशिपंपधारकांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत महावितरणने त्यंाचा प्रमाणपत्र देवून सत्कार केला आहे.
या ऊर्जा पर्वा अंतर्गत 461 ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत, 411 कृषीमेळावे, 14 सायकल रॅली, 232 बांधावर महावितरणचे अधिकारी यंानी जावून-कॅपॅसिटरचा वापरामुळे कृशीपंपांना योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळणे, कृशीपंप हाताळतांना घेण्यात येणारी खबरदारी, वीजसुरक्षा याबाबत प्रबोधन केले तसेच कृषी पंप धारकांना कृषी ऊर्जा पर्व बद्दल व होणार्या लाभाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता श्री.सुनील देषपांडे यंानी केले आहे.
राज्यातील कृषी ग्राहकांना नवीन वीजजोडणी, दिवसा 8 तास सौर कृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट देऊन मोठा दिलासा, कृषी वीजपुरवठा कृषी ग्राहकांच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण या उद्देशाने राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-2020 जाहीर केले असून, त्याची अंमलबजावणी केली जात या धोरणाचे फायदे जास्तीत जास्त कृषी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभर दि.1 मार्च ते 14 एप्रिल 2021 पर्यंत कृषी ऊर्जा पर्व अंतर्गत जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत. पथनाटय, दिवंडी आदीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
