चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आज २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भारत मातेचे वीर सुपुत्र भगतसिंह , राजगुरु आणि सुखदेव यांना आदरांजली वाहण्यात आली. मा. आयुक्त श्री. राजेश मोहीते यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमेस पुष्पहारअर्पण करण्यात आला.
याप्रसंगी बोलतांना आयुक्त म्हणाले की, भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव म्हटल्यानंतर समस्त भारतीयांसमोर क्रांतीचा, देशप्रेमाचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या त्रयिचा एक चेहरा येतो. त्यांना आजच्याच दिवशी 1931 साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवसाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो.चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे या शहीदांना शतशः नमन. या प्रसंगी उपायुक्त श्री. विशाल वाघ, श्री. अशोक गराडे, श्री. कवडू नेहारे,श्री. सुरेश माळवे, आशीष जिवतोडे, श्री. गुरुदास नवले, श्री अमूल भुते उपस्थीत होते.