ब्रह्मपुरी - ब्रह्मपुरी येथील शेतकरी विनोद सहारे यांनी नवीन हिरो कंपनीची डीलक्स गाडी खरेदी केली, मात्र दुचाकी खरेदी केल्यावर 8 फेब्रुवारीला त्यांच्या राहत्या घरून अज्ञात इसमाने चोरून नेली.
गाडीचे कागदपत्रे नसल्याने विनोद सहारे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली नाही.
फिर्यादीने स्वतः दुचाकींचा आरमोरी, वडसा, ब्रह्मपुरी व नागभीडला शोध घेतला मात्र दुचाकी कुठे आढळून आली नाही.
22 मार्च ला गणराज मोटर्स येथून त्यांना गाडीचे कागदपत्रे व बिल मिळाले, त्यानंतर सहारे यांनी तात्काळ ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथे दुचाकी चोरीची तक्रार नोंदविली, पोलिसांनी याप्रकरणी 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
22 मार्चला डीबी पथकाला पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहिती मिळाली की सदर चोरीतील दुचाकी वाहन प्रदीप उर्फ सोनू केवळराम मेश्राम याने मोटरसायकल चोरी केली आणि इतर गुन्ह्यातील दुचाकी वाहने साथीदार सचिन बादशहा नगराळे यांनी आरोपी प्रदीप मेश्राम कडे ठेवले असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी आरोपी प्रदीप मेश्राम ला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सदर वाहन चोरी केली असल्याची कबुली दिली.
आरोपी प्रदीपकडून एकूण 9 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या सदर वाहनांची एकूण किंमत 5 लाख 50 रुपये आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे, सुरेंद्र उपरे, अरुण पिसे, अमोल गिरडकर, योगेश शिवणकर, संदेश देवगडे, अजय कटाईत, मुकेश गजबे, विजय मैद, नरेश कोडापे व शुभांगी शेमले यांनी यशस्वीपणे पार पाडली.
पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आज.
