वरोरा - तालुक्यातील टेम्भूर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेत शुक्रवार मध्यरात्री च्या सुमारास अज्ञात चोरांनी बँकेच्या मागील बाजूस असलेली खिडकी गॅस कटरने तोडीत आत प्रवेश केला.
बँकेतील तिजोरी सुद्धा गॅस कटरने तोडीत त्यामधील 6 लाख 80 हजार रोख रक्कम व 10 तोळे सोनं असा एकूण 10 लाख रुपयांचा ऐवज अज्ञात आरोपींनी लंपास केला.
शनिवारी सकाळी गावातील काही नागरिकांना बँकेच्या मागील भागात गॅस सिलेंडर पडक्या अवस्थेत आढळल्याने त्यांना संशय आला असता लगेच पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले.
पोलीस आल्यानंतर बँकेत दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली, बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड सुद्धा करण्यात आली होती.
घटनास्थळी श्वान पथक बोलाविण्यात आले असून पुढचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व वरोरा पोलीस करीत आहे.