चंद्रपूर - महावितरण चंद्रपूर परिमंडळांतर्गत कृषिपंपधरकांना योग्य दाबाचा व व्यवस्थित वीजपुरवठा मिळून रोहित्रांवार ज्यादा भार न येता त्यांच्या नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी होण्यास कॅपॅसिटरचा वापर कृषिपंपधारकांनी करण्याचे तसेच, मंजूर भाराच्या प्रमाणातच मंजुर क्षमतेचे कृषिपंप वापरण्याचे आवाहन महावितरण चंद्रपूर परिमंडळाद्वारे करण्यात येत आहे. महावितरण द्वारा सघ्या कृषीउुर्जापर्व राबविण्यात येत असून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी कृषिग्राहकांच्या बांधावर जाऊन त्यांना वीजसुरक्षा, कॅपॅसिटरच्या वापरामुळे होणारे फायदे, कृषिपंप हाताळतांनाची खबरदारी, अनधिकृत वीजवापरामुळे होणारे अपघात, विदयुतसुरक्षेवर प्रात्यक्षिक, वीजउपकरणाच्या देखभाल व दुरूस्तीचंे महत्व, कृषी ऊर्जा पर्वाबददल माहिती देत आहेत. आजपर्यंत 255 बांधावर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी पोहोचून त्यंानी कृषीग्राहकांचे व गावकरी यांचे प्रबोधन केले आहे.
कृषिपंपधारकांनी त्यंाच्या कृषिपंपांवर आॅटोस्विच बसविल्यामुळे वीजपुरवठा सुरू झाल्याबरोबर एकाच वेळी कृषिपंप चालू होवून रेाहित्र अधिभारीत होवून नादुरूस्त होवू षकतात. त्यामुळे आॅटोस्विचचा वापर टाळावा. बÚयाच कृषिपंपांना कॅपॅसिटर लावलेले आढळून येत नाही. तरी प्रत्येक कृषिपंपांना प्ैप् नामांकित कंपनीचे कॅपॅसिटर लावण्यात यावे. कृषिपंपावर कॅपॅसिटर बसविल्याने योग्य क्षमतेचे कॅपॅसिटर लावल्याने कृषिपंपास योगय दाबाचा विदयुत पुरवठा मिळून कृषिपंपांचे आयुष्य वाढून ते योग्य प्रकारे काम करते.
कृषिपंपाची क्षमता कॅपॅस्टिरची क्षमता कृषिपंपाला कॅपॅसिटर नसल्यामुळे कृषिपंपाला कॅपॅसिटर असल्यामुळे लागणारा कमी भार
हाॅर्स पाॅवरमध्य केव्हीएआर लागणारा जास्तिचा भार अॅम्पिअरमध्ये
3 1 - ----------- ---------
5 2 12.2 10.0
7.5 3 15.3 12.5
12.5 5 27.0 22.0
कृषिपंपाला कॅपॅसिटर लावल्यामुळे वीजकंरट भार कमी होतो, कृषिपंपाला योग्य दाबाने विदयुतपुरवठा करण्यास मदत होते, रोहित्रावरील वीजभार कमी झाल्यामुळे रोहित्र नाुदरूस्त होण्याचे प्रमाण कमी होते, कृषिपंप जळण्याचे प्रमाण कमी होते तसेच विजयंत्रणेमध्ये योग्य दाब राखल्या गेल्यामुळे वितरण हानी कमी होते तसेच कृषिपंपाचे वीजबिल कमी होण्यासही मदत होते.
मंजूर भारापेक्षा अधिक भाराचे कृषिपंप वापरणे वीजकायदा 2003 नुसार बेकायदा आहे. उदा. 3 हाॅर्सपाॅवरची परवाणगी असतांना 5 हाॅर्सपाॅवरचे, 5 हाॅर्सपाॅवरची परवाणगी असतांना 7.5 हाॅर्सपाॅवरचे ई.कृषिपंप वापरणे. अषाप्रकारे मंजूर भारापेक्षा अधिक भाराचे कृषिपंप वापरणे विजयंत्रणेसाठी घातक आहे. अषाप्रकारच्या वापराच्या विरोधात वीज कायदा 2003 अन्वये कारवाईचे होवू षकते.
कॅपॅसिटरचा वापर करून कृषिपंपधारकांनी महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देषपांडे यांनी केले आहे.
