चंद्रपूर - कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी मार्च २०२० रोजी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव असतांना देखील महावितरणने ग्राहकांना अखंडित व नियमित वीज पुरवठा केला. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्याच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. मुख्यालयाद्वारा निर्गमित दिनांक १३ नोव्हेंबर २०२०च्या परिपत्रकानुसार थकबाकीदरांना दिलासा देण्यासाठी हफत्याने वीजबिल भरण्याची सोयही उपलब्ध करुन देण्यात आली होती. दिनांक ३१ मार्चपर्यंत अशा थकबाकीदारांनी थकबाकीचा भरणा करुन महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री सुनिल देशपांडे यांनी केले आहे.
१७ मार्च २१ पर्यंत चंद्रपूर परिमंडळातील घरगुती ,वाणिज्यिक व औदयेागिक अशा एकंदरीत ७ हजार ९६ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यात ५ हजार ६०६घरगुती, १ हजार८३ वाणिज्यिक व २०७ औदयेागिक ग्राहकांचा समावेश आहे. या सर्व ग्राहकांनी एकून ५ कोटी २७ लाख थकविले आहेत. यात चंद्रपूर मंडलातील २ हजार २५६ घरगुती ,७०० वाणिज्यिक व १४२ औदयोगिक ग्राहक तसेच गडचिरेाली मंडलातील ३३५० घरगुती, ३८३ वाणिज्यिक व ६५ औदयोगिक ग्राहकांचा वीजपुरवठा ख्ंडीत करण्यात आलेल्यांचा समावेश आहे.
१७ मार्च २१ पर्यंत चंद्रपूर परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औदयेागिक अशा एकंदरीत १५ हजार ग्राहकांनी एप्रिल २०२० पासून एकंदरीत १० कोटी ४५ लाखाचा भरणा केला नाही.
चंद्रपूर मंडलातील ७ हजार ७८८ हजार ग्राहकांनी ६ कोटी ४५ लाख व गडचिरेाली मंडलातील ७हजार ३९२ ग्राहकांनी ४ कोटी भरले नाही.
एप्रिल २०२० ते १ फेब्रुवारी २०२१ दरम्यान एकही वीजबिल न भरलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औदयेागिक अशा एकुन ८८ हजार २१४ ग्राहकांकडे ७० कोटी थकबाकी जमा झाली होती. त्यापैकी ६६ हजार ५९६ ग्राहकांनी ५२ केाटी ५५ लाख १७ मार्च २१ पर्यंत भरले आहे व वीजपुरवठा खंडीत केल्या जाण्याच्या कारवाईपासून बचावले आहेत. तर चंद्रपूर परिमंडळातील घरगुती ,वाणिज्यिक व औदयेागिक अशा एकंदरीत ७ हजार ९६ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
अजनूही १५ हजार १८० ग्राहकांकडून १० कोटी ४६ लाख् येणे बाकी आहे. अशा सर्व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई सर्वत्र सुरु असून थकबाकीदरांनी थकबाकीचा भरणा करुन महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री सुनिल देशपांडे यांनी केले आहे.
