घुगूस - आज दुपारी 3 वाजेदरम्यान नागाडा चौकात 3 वाहनांचा विचित्र अपघात घडला या अपघातात 2 वाहनचालक किरकोळ जखमी झाले.
चंद्रपूर वरून नागाडा जाणाऱ्या वाहन क्रमांक एम एच 34 बिजी 5084 जनावरांचा चारा घेऊन येत असताना नागाडा येथे समोरून वाहन येत होता म्हणून थांबला असता पडोली कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच 34 बिजी 1588 ने पिकअप वाहनाला मागून जोरदार धडक मारली, या धडकेत पिकअप वाहनाने समोरून येणाऱ्या वाहन क्रमांक एम एच 34 बिजी 8164 ला धडक दिली.
या धडकेत दोन्ही वाहनाचे नुकसान झाले मात्र ट्रक चालकाने धडक दिल्यावर तिथून पसार झाला.
या अपघातात दोन्ही पिकअप वाहनातील वाहनचालक रमेश शेलवटे व सचिन लोनगाडगे हे किरकोळ जखमी झाले.
या विचित्र अपघाताच तक्रार घुगूस पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
