चंद्रपूर - महावितरणच्या मोबाईल अॅप्सचा राज्यातील ग्राहकांना मोठा लाभ मिळत असून महावितरणच्या कामकाजातही गतीशीलता व पारदर्शकता आली आहे. महावितरणच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल अॅप्समुळे राज्यातील ग्राहकांना तत्पर व ऑनलाईन सेवा मिळत आहे. तसेच महावितरणचे कर्मचारी मोबाईल अॅप्सद्वारे विविध दैनंदिन कामे ऑनलाईन करीत असल्यामुळे महावितरणच्या कामकाजात गतीशीलता व पारदर्शकता आली आहे.
चंद्रपूर परिमंडळांतर्गत – चंद्रपूर व गडचिरोली मंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औदयोगिक व कृषिग्राहक अशा एकूण 6 लाख 53 हजार 205 ग्राहकंानी मोबाईल क्रमांकांची नेांदणी केली यात चंद्रपूर मंडलातील - 3 लाख 80 हजार 796 ग्राहक तर गडचिरोली मंडलातील - 2 लाख 72 हजार 409 ग्राहकांचा समावेश आहे..
चंद्रपूर मंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औदयोगिक अशा 4 लाख 9हजार 444 ग्राहकांपैकी 3 लाख 80 हजार 796 ग्राहकांनी तर गडचिरोली मंडळातील 3 लाख 24 हजार 269 ग्राहकांपैकी 2 लाख 72हजार 409 ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे.
चंद्रपूर मंडळातील 41हजार 634 कृषिपंपधारक ग्राहकांपैकी 28 हजार 662 तर गडचिरोली मंडळातील 33 हजार 838 कृषि ग्राहकांपैकी 23 हजार 694 कृषि ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे.
महावितरणच्या ग्राहकांना मीटररिडींग, वीजबील, ऑनलाईन बील, नवीन वीजजोडणीसाठी अर्ज व त्याची सद्यस्थिती, मीटर वाचन घेतल्याचा आणि देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे इत्यादीबाबतच्या सूचना महावितरणतर्फे एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहेत.
व या सर्व सेवा ग्राहकंाना देण्यासाठी मोबाईल क्रमांकांची क्रमांकाची नोंदनी करने आवष्यक आहे. सध्या परिस्थितीत चंद्रपूर मंडलातील 90.77 टक्के तर गडचिरोली मंडलातील 82.19 टक्के ग्राहकंानी नोंदनी केली आहे. उर्वरीत ग्राहकंानी नोंदनी केल्यास त्यंानीही या सुविधा एसएमएसद्वारा प्राप्त होणार.
सध्या परिस्थितीत चंद्रपूर मंडलातील 90.77 टक्के तर गडचिरोली मंडलातील 82.19 टक्के ग्राहकंानी नोदनी केली आहे. उर्वरीत ग्राहकंानी नोंदनी केल्यास त्यंानीही या सुविधा एसएमएसद्वारा प्राप्त होणार.
आपल्या भागातील रोहित्रात बिघाड झाला असेल, किंवा दुरूस्ती कामासाठी वीजपुरवठा ख्ंाडीत करावयाचा असल्यास त्याबाबत माहिती ही एसएमएसने महावितरणद्वारे देण्याची सुविधा प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या टोल फ्रि क्रमांकावर 18002333435, 18001023435 किंवा 1912, 01912 वर फोन करून नोंदनी करावी लागेल. किंवा 9930399303 या क्रमांकावर MERG<ग्राहक क्रमांक> ( उदा. MERG 450010521332 ) अषाप्रकारचा एसएमएस पाठवून नेांदणी करता येईल. सदर एसएमएस पाठविल्यावर VK-MSEDCL द्वारा आपले रजिस्ट्रेषन झाल्याबाबत नेांदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी झाल्याचा एसएमएस प्राप्त होईल. हा एसएमएस काही वेळा उषिरा प्राप्त होवू शकतो. परंतु आपले रजिस्ट्रेशन हे झालेले असेल. हे एसएमएस पाठवितांना स्पेस देण्यास विसरू नये.
चंद्रपूर परिमंडलातील ज्या ग्राहकंानी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली नसेल अषा सर्व ग्राहकंानी त्याची नोंदनी करण्याचे आवाहन मुख्य अभियंता श्री सुनील देशपांडे यांनी केले आहे.