वरोरा - राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असून लॉकडाउन सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे मात्र या परिस्थितीत सुद्धा अवैध दारू तस्करी जोमात सुरू आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने वरोरा तालुक्यात मोठी कारवाई करीत तब्बल 450 अवैध दारूच्या पेट्या पकडल्या. #News34
उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहिती द्वारे वाठोडा तालुक्यात अवैध दारू तस्करी होत असल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचत कारवाई केली असता बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच 49 डी 6131 व एम एच 40 बीएल 0336 पकडत त्यामधील रॉकेट देशी दारूच्या 450 पेट्या जप्त केल्या.
सदर अवैध दारू व एकूण मुद्देमाल 17 लाख 20 हजारांचा उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला, मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
उत्पादन शुल्क विभागाने दारूबंदी मदाका अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
सदर कारवाई अधीक्षक उत्पादन शुल्क सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक अमित क्षीरसागर, चेतन अवचट, जगन पट्टलवार, सुदर्शन राखुंडे यांनी यशस्वी पार पाडली.
Daaru pakde sahi hai, magar jo gali mohalle daru teji bik rahi hai, unko permission diye
उत्तर द्याहटवा