चंद्रपूर - राज्य शासनाने कृषिपंप, वीजजोडणी धोरण-2020 जाहीर केले असून, त्याची अंमलबजावणी केली जात या धोरणाचे फायदे जास्तीत जास्त कृषी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभर दि.1 मार्च ते 14 एप्रिल 2021 पर्यंत राबविण्यात येत असलेल्या कृषी ऊर्जा पर्व दि.12.03.2021 रोजी गडचांदुर उपविभागाअंतर्गत (बल्लारशाह विभाग) बिबी ग्रामपंचायत येथे प्रादेशिक संचालक नागपूर श्री. सुहास रंगारी, मुख्य अभियंता चंद्रपूर श्री. सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता चंद्रपूर संध्या चिवंडे, अधीक्षक अभियंता श्री.हरीश गजबे , कार्यकारी अभियंता श्री.महेश तेलंग व उपसरपंच श्री.देरकर यांच्या उपस्थितीत घेतलेल्या मेळाव्यात कृषी योजना 2020 बद्दल सविस्तर माहीती शेतकऱ्यांना देण्यात आली. सदर कार्यक्रमात चंद्रपूर मंडळ यांनी तयार केलेल्या कृषी ऊर्जा पर्वा साठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथ तसेच पथनाट्य चे उद्घाटन मा.प्रादेशिक संचालक श्री.सुहास रंगारी यांच्या हस्ते करण्यात आले.
चित्र रथा च्या माध्यमातून कृषिऊर्जा कॅपॅसिटर च्या वापरा मुळे होणारे फायदे, विजसुरक्षा,माझे वीजबिल माझी जबाबदारी चा संदेश देण्यात आला. पथनाट्य माध्यम वापरून कृषिऊर्जा पर्व मधून कृषिग्राहकांना होणाऱ्या लाभांवर जनजागृती करण्यात आली.
या मेळाव्यात प्रादेशिक संचालक नागपूर यांचे आव्हानाला प्रतिसाद देत 126 कृषी ग्राहकांनी 15.72 लक्ष रुपयाचा भरणा केला व कृषी वीज थकबाकी मुक्त झाले.
तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या शाखा अभियंता व वीज कर्मचारी यांचे मनोबल वाढण्यास प्रोत्साहन म्हणून त्यांचाही सत्कारही याप्रसंगी करण्यात आला.
ग्रामवासी श्री.पांडुरंग चंने यांनी सोलर पार्क साठी यावेळी 11 एकर शेत जमीन देण्यास तयारी दर्शवली.


