घुगूस - 13 मार्चला रात्री 10 वाजेदरम्यान विद्या टॉकीज समोरील पाणठेल्या जवळ ट्रक चे वाहनचालक जेवण करीत असताना क्षुल्लक कारणावरून आपसात झगडा होत गोष्ट मारहाणीपर्यंत पोहचली.
यामध्ये एका वाहन चालकाने दुसऱ्याला कटार ने वार करीत जखमी केले.
47 वर्षीय बलविंदर सिंग गुरनेल सिंग यांच्या मांडीवर गंभीर दुखापत झाल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आरोपी हरिशंकर रामसुचित उपाध्याय हा वाहन चालक फिर्यादी बलविंदर ला अश्लील शब्दात शिवीगाळ करायला लागला, काही वेळात शाब्दिक बाचाबाची चे रूपांतर मारहाणीत झाले यामध्ये हरिशंकर ने स्वतः जवळील कट्यार ने बलविंदर वर वार केला.
बलविंदर च्या मांडी ला कट्यार लागल्याने त्याला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले .
प्रकरणाची तक्रार घुगूस पोलीस स्टेशनमध्ये दाखल होताच पोलिसांनी आरोपी हरिशंकर ला ताब्यात घेतले, आरोपी हरिशंकर हा दारू पिऊन आल्याचे त्यावेळी आढळले होते.
हरिशंकर वर 326, 504 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
