नागपूर - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख काका’ काटोल मतदारसंघातून गायब झाले आहेत, असं म्हणत पुतणे आशिष देशमुख यांनी घरचा आहेर दिला. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अनिल देशमुख आणि काँग्रेस नेते आशिष देशमुख या राजकीय क्षेत्रातील काका-पुतण्यामधली ‘तू तू मै मै’ पुन्हा उघड्यावर येण्याची चिन्हं आहेत. अनिल देशमुख निवृत्त होण्याची वेळ आली आहे, असं सांगत आशिष देशमुखांनी आपण लढण्याचा इरादा व्यक्त केला. #News34
“अनिल देशमुख हे नागपुरातील काटोल या आपल्याच मतदारसंघातून गायब आहेत. त्यांच्यावर काटोलची जनता नाराज आहे. गेल्या सव्वा वर्षात कोणतीही कामं झालेली नाहीत, त्यामुळे मी सक्रिय व्हावं, अशी जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी होती” अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी दिली.