चंद्रपूर - शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह चंद्रपूर येथे रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे टीव्ही व वॉटर प्युरीफायर भेट देण्यात आली.
सदर शासकीय बालगृहात बालकल्याण समिती यांच्या आदेशाने काळजी व सरंक्षणाची गरज असलेले बालके दाखल होतात.
यावेळी रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष महेश उचके, अरुण थिके, मेडिकल डायरेक्टर डॉ. आसावरी देवतळे, नितीन पोहाने, बाळ न्याय मंडळ सदस्य एड. क्षमा बासरकर यांनी टीव्ही व वॉटर प्युरीफायर भेट दिली व संस्थेतील बालकांना भविष्यात येणाऱ्या अडचणी शिक्षण व पुनर्वसन यावर मुलांना मार्गदर्शन केले व 18 वर्षावरील बाहेर पडलेल्या गरजू व होतकरू बालकांच्या शिक्षणाची तयारी कार्यक्रमात उपस्थितांनी दर्शवली. #News34Chandrapur
आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, आभारप्रदर्शन समुपदेशक निलेश जक्कुलवार यांनी केले.
