ताजी बातमी - दमन दीवचे अपक्ष खासदार मोहन डेलकर हे मुंबईतील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आले. #News34Chandrapur त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. मरीन ड्राईन परिसरातील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळला, खासदार मोहनभाई डेलकर यांचा मृतदेह हॉटेल सी ग्रीनमध्ये आढळून आला. त्यांच्या मृतदेहाशेजारी गुजरातीमध्ये सुसाइड नोटही सापडली असल्याचं म्हटलं जात आहे.
1989 मध्ये ते पहिल्यादा दादरा आणि नगर हवेली मतदारसंघातून अपक्ष म्हणून लोकसभेवर निवडून आले होते. 1991 आणि 1996 मध्ये ते काँग्रेसतर्फे पुन्हा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर 1998 मध्ये भाजपकडून ते लोकसभेत आले. 1999 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून आणि 2004 मध्ये भारतीय नवशक्ती पार्टीतर्फे त्यांनी लोकसभेची जागा मिळवली होती.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत.
