चंद्रपूर - शहरात दिवसेंदिवस दुचाकी व चारचाकी वाहनाचे प्रमाण वाढत आहे, प्रशासन रस्ते अरुंद करीत आहे मात्र त्या रस्त्यावर खाजगी ट्रॅव्हल्स चालक आपले वाहन उभे ठेवत असल्याने नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
तसेच रस्त्यावर खाजगी ट्रॅव्हल्स मुळे अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढत आहे, पाणी टंकी ते वरोरा नाका चौक, सावरकर चौक ते मुल मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी जणू अतिक्रमणच केलं की काय अशी अवस्था झाली आहे. #News34Chandrapur
प्रशासनाने खाजगी ट्रॅव्हल्स चालकांची ही मुजोरी थांबवावी असे निवेदन भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीचे विदर्भ सचिव संजय अनेजा यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व जिल्हा पोलिस अधीक्षक साळवे यांना दिले.
प्रशासनाने यावर तात्काळ पाऊले उचलून कारवाई करावी अन्यथा पक्षातर्फे उग्र आंदोलन करणार असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख गुरुदत्त सिंह, महिला शहर अध्यक्ष रंजिता पेटकर, प्रमिला मुन, शशिकला, पांडुरंग पेटकर, देबाशीष, प्रतीक बोबाटे व मीना कुंभरे उपस्थित होते.
