ताजी बातमी - राज्यात कोरोनाने पुन्हा उद्रेक केला असून रोज 10 हजारांचा आकडा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पार झाला आहे, या परिस्थितीमुळे राज्य पुन्हा एकदा लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. असे विधान मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज केले.
राज्यातील काही शहरात कडक निर्बंध घ्यावे लागतील तसेच तामिळनाडूत परिक्षा न घेता सर्व विद्यार्थ्यांना पास केलं, राज्यात याबाबत विचार सुरु आहे. Lockdown again in maharashtra?
पोहोरादेवीतील गर्दीस जबाबदार असणाऱ्यावर कारवाई होणार, मग ते कोणीही असोत, मुंबई लोकलमध्ये गर्दी कशी कमी होईल याचाही विचार सुरु असून मुंबई लोकलच्या फेऱ्या कमी करण्याबाबत निर्णय लवकरच घेणार आहे.
नागपूरबाबत ठोस निर्णय घ्यावा लागणार, सार्वजनिक कार्यक्रमावर पूर्णपणे बंदी करीत कारवाई होणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
