प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - शुभम फुटाणे या अभियंत्याची अपहरण करून हत्या झाल्याचा उलगडा तब्बल 28 दिवसानी झाला.
2 अपहरण करणारा आरोपी अभियंता गणेश पिंपळशेंडे याला घुगूस पोलिसांनी ताब्यात घेत आज सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी गणेशला 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
आरोपी गणेश सोबत अजून या अपहरण हत्या प्रकरणी सहभागी आहे काय? अपहरण केल्यानंतर असे काय घडले की गणेशने शुभमची हत्या करण्याचे पाऊल उचलले असे अनेक प्रश्नांची उत्तरे आरोपिकडून पोलिसांना हवी. #News34Chandrapur
30 लाखांसाठी वेकोली कर्मचारी यांचा मुलाचं अपहरण आरोपी गणेशने केले होते, अनेक दिवस पोलिसांना सुद्धा या प्रकरणात काही सुगावा मिळाला नाही.
