चंद्रपुर - 22 वर्षाच्या तरुणीला आत्महत्येचा मार्ग पत्करून जीव गमवावा लागला, त्या तरुणीच्या आत्महत्येला राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे सर्वस्वी जबाबदार असून ठाकरे सरकार ने त्यांचा राजीनामा घेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज मूल रोडवर भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अंजली घोटेकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध व चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
आज पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येला 15 दिवस उलटून गेले तरीही पोलिसांनी यावर संजय राठोड यांची साधी चौकशी सुद्धा केली नाही.
यावेळी भाजप महिला शहराध्यक्ष अंजली घोटेकर यांनी आपली प्रतिक्रिया देत राज्य सरकार वर संताप व्यक्त करीत निषेध केला, महिलांच्या जीवावर हे सरकार उठले असून तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या वनमंत्री संजय राठोड यांचा ठाकरे सरकारने राजीनामा घेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा होता मात्र आपल्या पक्षाचा मंत्री असल्याने आजपर्यंत अशी कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.
2 फेब्रुवारीला पूजा ही पूजा अरुण राठोड नावाने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात येत गर्भपात करायला भाग पाडले, ती गर्भधारणा राठोड यांचेकडून झाली व त्यासाठी तिने मंत्री राठोड कडे लग्नाचा तगादा सुद्धा लावला मात्र स्वतःच्या प्रतिष्ठेला जपणाऱ्या मंत्र्याने तिला वाऱ्यावर सोडत आत्महत्येसाठी प्रवृत्त केले.
या गंभीर प्रकरणात संजय राठोड यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी भाजप महिला आघाडी ने आज निषेध व चक्काजाम आंदोलन केले.