चंद्रपूर - गोंडवाना विद्यापीठाने जुन्या अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क पाच पटीने वाढविले. हा निर्णय आता रद्द करण्यात आला असून विद्यार्थ्यांना जुने शुल्क आकारले जाणार आहे. या निर्णयाचे आता सर्वत्र स्वागत केले जात आहे. विशेष म्हणजे या विषयाची गंभीर दखल घेऊन,आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर भाजपा उपाध्यक्ष सूरज पेदुलवार यांनी एका शिष्ठमंडळासह कुलगुरूंना निवेदन सादर केले होते. त्या नंतर हा निर्णय घेण्यात आला. या उपलब्धीसाठी विद्यार्थ्यांनी आ मुनगंटीवार यांची भेट घेऊन विशेष आभार व्यक्त केले.
यावेळी महानगर भाजपा उपाध्यक्ष सुरज पेदुलवार,महानगर भाजयुमो महामंत्री प्रज्वलंत कडू, दीपक नगराळे, शशांक काकडे,ओम अडगुरवार, प्रदीप राठोड,अमोल बडकल,आशिष बोकडे आणि अरविंद कांतिवार यांची उपस्थिती होती. #news34
गोंडवाना विद्यापीठातील परिक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड दयावे लागत होते. या समस्या आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार सुरज पेदुलवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने कुलगुरूंसमोर दि. २८.०१.२०२१ ला निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या. त्याअनुषंगाने परिक्षा आवेदन स्विकारण्याची तारीख विद्यापीठाने वाढवुन दिली होती. तसेच जुन्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना परीक्षा आवेदन पत्र भरण्याची संधी देखील देण्यात आली.परंतु हि संधी विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची थट्टा करणारी होती. जुन्या अभ्यासक्रमातील पदवी परिक्षा शुल्क पाच पटीने वाढविण्यात आले होते . विद्यपीठाने दि .१५.०२.२०२१ हि आवेदन पत्र स्विकारण्याची अंतिम तारीख जाहीर केली.हेच नाहीतर परीक्षा शुल्क १९७१ रूपये ऐवजी ९८५५ रूपये आकारण्यात येईल असेही जाहीर केले.या प्रकाराने त्रस्त विद्यार्थ्यांनी आ मुनगंटीवार यांच्या कडे धाव घेतली. महानगर भाजपा उपाध्यक्ष सूरज पेदूलवार यांच्या नेतृत्वात एका शिष्ठमंडळाने भेट घेण्याचा सूचना आ मुनगंटीवार यांनी दिल्यावर प्रकरण मार्गी लागले. सामान्य कुटुंबातील विदयार्थ्यांना एका दिवसात १०,००० रक्कम भरणे काही सोयीचे नाही, कोरोना काळात आधीच लोकांचे जिवन कष्टदायी झाले आहे.घरची चुल चालवणे यासाठी देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. या सर्व परिस्थितीत विद्यापीठाने केलेली परीक्षा शुल्क दरवाढ ही विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची थट्टा करण्यासारखी आहे याकडे पेदुलवार यांनी कुलगुरुचे लक्ष वेधले.विद्यापीठ हे विद्यादानाचे केंद्र असुन व्यवसाय नाही. विद्यापीठाने विद्यांर्थ्यांवर अन्याय केल्यास ते भारतीय जनता पार्टी सहन करणार नाहीअसा गर्भित इशारा त्यांनी दिला. त्वरीत परिक्षा शुल्कवाढ मागे घेवुन पुर्वीप्रमाणेच आकारणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे सुरज पेदुलवार यांनी केली.ही मागणी आता मान्य झाल्याने विद्यार्थ्यांचा जीव सुखावला आहे.