गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धेत अ गटात(वर्ग ५ ते ७)ग्रामीण विभागात तृतीय क्रमांकचा पुरस्कार स्थानिक महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथील वर्ग ६ (अ)ची विद्यार्थीनी कु.प्राची गायकवाड हिने मिळविला. मुख्याध्यापक,उप मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका यांच्या हस्ते प्राचीला पुरस्कार, प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रा. अशोक डोईफोडे,मार्गदर्शक शिक्षिका स्वाती केळकर, वर्गशिक्षिका प्रतिभा गेडाम, संजय झाडे,बंडु धोटे,अनील मडावी सह इतर शिक्षकांची उपस्थिती होती.