वरोरा : बचत गटाच्यामाध्यमातून प्रगती साधने शक्य आहे. मात्र त्यासाठी या गटांना प्रोत्साहन तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेचे संस्थापक रमेश राजुरकर यांनी सुरु केलेले काम प्रशंसनीय आहे. यातून जिल्ह्यातील महिला बचत गटांची प्रगती होईल, असा आशावाद राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी वरोरा येथे जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेचे संस्थापक तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेश राजुरकर यांची भेट घेत बचतगटासाठी केलेल्या कामाची माहिती जानून घेतली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे, माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, भद्रावती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुजाज शेख, वरोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विशाल पारखी, आदित्य राजुरकर, मुकूल राजुकर,माया राजुरकर यांच्यासह जय गुरुदेव संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रमेश राजूरकर यांनी बचत गटांनी तयार केलेल्या साहित्यासंदर्भात ना. जयंत पाटील यांना माहिती दिली. दरम्यान, महिला सक्षमीकरण तसेच सुशिक्षीत बेरोजगारांकरिता रोजगार, स्वयंरोजगारासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. या कामासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन ना. पाटील यांनी यावेळी दिले.