चंद्रपूर/: गोंडपीपरी - पंचायत राज समितीच्या गोंडपीपरी दौऱ्यात आकसापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील दौऱ्यात मुदतबाह्य औषध साठा आढळल्याने समितीने औषध निर्मात्यालाचं निलंबित केले.
सोबतच जिल्हा परिषदेच्या शाळेला सुद्धा समितीने भेट दिली असता दैनंदिन कामकाज पद्धती, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा व संवाद साधला.
पंचायत समित्यांच्या आढाव्यात अनेक त्रुटी आढळल्याने कामात अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांना समितीने चांगलेच धारेवर धरले.
जिल्हा परिषदेच्या लेखा परीक्षा आक्षेपावर परिच्छेदांची तपासणी केल्यावर त्यामध्ये तब्बल 42 प्रकरणात अनियमितता आढळल्याचा ठपका समितीने ठेवला
समितीच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस असून उरलेल्या कामकाजाचा आढावा समिती घेणार आहे, 2011 -12, 2017-18 या वर्षातील वार्षिक प्रशासन अहवालावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले यांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे.
