चंद्रपूर - सदर विषयांसंदर्भात युवासेना जिल्हाप्रमुख निलेशभाऊ बेलखेडे यांनी गोंडवाना विद्यापिठ गडचिरोली मा.प्रशांत ठाकरे, सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापिठ यांच्यामार्फत पाठपुरावा करून विद्यापिठास विद्यार्थ्यांना दिलासादायक निर्णय घेण्यास विनंती केलेली होती. #News34Chandrapur
विद्यार्थ्यांना परिक्षा देण्याकरिता एक पुन्हा संधी देण्यासंबंधी नविन अधिसुचना काढावी हि मागणी ला घेऊन मा. ठाकरे सर व युवासेनेच्या या मागणी ला मान्य करून विद्यापिठामार्फत नवीन पत्रक जाहिर करण्यात आले कि पुन्हा एक शेवटची संधी विद्यार्थ्यांना देण्यात येत असून विदयार्थ्यांनी परिक्षा अर्ज भरून घ्यावा अशी अधिसूचना विद्यापिठामार्फत काढण्यात आली. या विद्यार्थी हिताच्या निर्णयाकरिता चंद्रपुर युवासेने तर्फे सिनेट सदस्य मा. डॉ प्रशांत ठाकरे सर व गोंडवाना विद्यापिठ परिक्षा, मुल्यमापन नियंत्रक डॉ. चिताडे सर यांचे आभार मानण्यात आले.
