राजुरा - राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन पोलिस ठाणे अंतर्गत येणार्या चनाखा या गावाजवळ कोंबड बाजार सुरू असतांना विरूर पोलिसांनी धाड घालून कोंबडे, रोख रक्कम व तीन मोटरसायकल सह एकूण दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. आज दिनांक 7 फेब्रुवारीला दुपारी चार वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.
आज दुपारी चनाखा या गावाजवळ काही लोक कोंबड्याच्या झुंजी लावून जुगार खेळत असतांना पोलिसांनी धाड घातली. #News34Chandrapur
सध्या राज्यात बर्ड फ्लूचे सावट सुरू असून सुद्धा कोंबडा बाजार प्रेमींनी लपून छपून कोंबड्यांचा झुंजीचा कार्यक्रम सुरू केलं, मात्र पोलिसांनी त्या कोंबडा झुंज प्रेमींचा भंग धाड पाडून केला.
कार्यवाहीत तीन पाती लावलेले कोंबडे, नगदी रक्कम, तीन मोटरसायकल असा एकूण 1 लाख 96 हजार 120 रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आकाश वाघमारे, विनोद पारखी, स्वप्निल कोडापे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार झाले. पोलिसांनी जुगार प्रतिबंधक अधिनियमा नुसार गुन्हा दाखल केला असून विरुर ठाणेदार कृष्णा तिवारी, पोलीस उपनिरीक्षक सदानंद वडतकर, सहाय्यक फौजदार सफरद खान पठाण, हवालदार दिवाकर पवार यांनी ही कारवाई केली. पुढील तपास विरूर पोलीस करीत आहे.
