प्रतिनिधी/सैय्यद मुमताज अली
कोरपना - तालुक्यात गेल्या पाच महिन्यांपूर्वी अचानकपणे आलेल्या चक्री वादळामुळे पावसाने कहर केला होता, यात तालुक्यातील इतर ठिकाणासह नांदा येथील घरांचे नुकसान व आठ ते दहा विद्युत खांब कोसळल्याने शेतकऱ्यांचा कृषी पंपाचा वीज खंडित झाला होता.
विद्युत विभागाचा भोंगळ कारभार या माध्यमातून उघडकीस आला होता अनेकदा निवेदने देऊनही वीज विभाग यावर गंभीर नव्हता.
याबाबत 7 फेब्रुवारीला News34 ने "विद्युत विभागाचा भोंगळ कारभार" या मथळ्याखाली बातमी प्रसारित केली होती.
त्या बातमीचा दणका बसत वीज वितरण कंपनीने काल 12 फेब्रुवारीपासून नवे वीज खांब लावण्यास सुरुवात केली.
अस्मानी संकट गेल्यावर वीज विभाग शेतकऱ्यांच्या डोक्यावर जमिनी संकटासारखा उभा होता.
मात्र news34 च्या बातमीची दखल घेत वीज विभागाने तात्काळ कामाला सुरुवात करून शेतकऱ्यांचा रब्बी हंगामात येणाऱ्या अडचणी काही प्रमाणात सुटणार असून शेतकरी सध्या आनंदी वातावरणात आहे.
