चंद्रपूर - मागील 7 महिन्यापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपुरातील कार्यरत कंत्राटी कामगारांचे वेतन थकीत आहे, मात्र प्रशासन यावर अजून आपली भूमिका स्पष्ट मांडू शकण्यात असमर्थ ठरले आहे.
कोरोना काळात कंत्राटी कामगारांनी शासकीय महाविद्यालयात अविरत सेवा दिली मात्र त्या सेवेचा शासनाकडून कसलाही परतावा मिळाला नाही.
कामगारांचे वेतन मिळावे यासाठी जनविकास सेना वारंवार प्रशासना कडे पाठपुरावा करीत आहे मात्र त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळत नसल्याने जनविकास सेना अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 500 कंत्राटी कामगारांचे डेरा आंदोलन सुरू आहे. #News34Chandrapur
आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे, आंदोलनातील 3 कामगारांची तब्येत बिघडली असून त्यांचेवर उपचार सुरू आहे.
2 वर्षांपासून कंत्राटी कामगार किमान वेतनापासून वंचित आहे, वेतन मिळावा यासाठी अनेक आंदोलने झाली तरीसुद्धा प्रशासन कामगारांची दखल घेत नाही आहे.
या सर्व कामगार विरोधी धोरणाला वैधकीय संचालक पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने आहे असा थेट आरोप जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी पत्रकार परिषदेद्वारा केला आहे.
लहाने यांचा पद्मश्री सन्मान सरकारने परत घ्यावा अशी मागणी जनविकास सेना राष्ट्रपती कोविंद यांना निवेदनाच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली.
विशेष म्हणजे राज्याचे मदत व पुनर्वसन व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे, पालकमंत्री यांना अल्ट्राटेक, एसीसी सिमेंट कंपनीतील कामगारांच्या समस्या दिसल्या मात्र चंद्रपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कामगारांच्या समस्या दिसत नाही काय? ते सुद्धा कामगारच आहे, आज आपल्या मुलांना घेऊन 500 कंत्राटी कामगार वेतनासाठी आंदोलन करीत आहे त्यांचं दुःख पालकमंत्री वडेट्टीवार समजणार का? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे.
