चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली असल्याने चंद्रपूरच्या राजकारणात या बातमीने खळबळ उडाली आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर जिल्ह्यातील शासकीय समितीमधील वाटा हा 60% व 20%, 20% टक्के कांग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात ठरला होता.
मात्र आश्वासन हे ठरल्याप्रमाणे आश्वासनच राहील पालकमंत्री वडेट्टीवार यांनी शब्द न पाळल्याने शिवसेनेच्या चंद्रपूर, बल्लारपूर, पोम्भूर्णा, मुल, जिवती, कोरपना, गोंडपीपरी व राजुरा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना समितीच्या तब्बल 16 सदस्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे.
असे पत्र खुद्द शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.
तीन पक्षाच्या या सरकारमध्ये कांग्रेस चंद्रपूर जिल्ह्यात वरचढ होत आहे, राष्ट्रवादी व शिवसेनेला सन्मानपूर्वक वागणूक कांग्रेस देत नसल्याने शिवसेनेला टोकाचा निर्णय घ्यावा लागला.
या सामूहिक राजीनाम्याने पालकमंत्री वडेट्टीवार काही संज्ञान घेतील का हे तर येणारी वेळचं सांगेल.
