नागपूर - मागील काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना शहरात lockdown होणार का या चर्चेला पालकमंत्री नितीन राऊत यांनी विश्राम दिला. नागपुरात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. परंतु तूर्तास लॉकडाऊन केलं जाणार नाही. मात्र कठोर निर्बंध लावले जातील, अशी माहिती नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. नागपूर शहरात कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे शहरातील बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 7 मार्चपर्यंत आठवडी बाजार, शाळा कॉलेज बंद राहणार आहे.
