गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुका हा वनसडी,पिपर्डा, पकड्डीगडम मार्गे जिवती तालुक्याला जोडणारा रस्ता असून मुख्यमंत्री सडक योजना २०१८,१९ वित्तीय वर्षात प्रस्तावित करण्यात आली.याच श्रेणीत पिपर्डा पोच मार्गाच्या कामाची निविदा होऊनही कंत्राटदार कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप होत असून गेल्या वर्षी याठिकाणी कामाची सुरूवात करून रस्त्यावर गिट्टी,बोल्डर,मुरूम साठवले, थातूरमातूर रस्तयाची साफसफाई करण्यात आली. मात्र येथील काम पुर्ण होण्याऐवजी साठवलेले साहित्य उचलून दुसऱ्या ठिकाणी वापरले गेले. रस्त्याची अवस्था बिकट बनली असून नागरिकांना वाहन चालवणे अक्षरशः जिकरीचे ठरत आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने "खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे" समजणे कठीण झाले आहे.
जि.प.बांधकाम किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील १० वर्षात खड्डे बुजविण्याचा देखील प्रयत्न केला नसल्यामुळे रस्त्याची पुरती वाट लागली आहे.निधी व मजूर उपलब्ध असताना सुद्धा काम न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई का होत नाही.हे कोडेच बनले आहे.कामाकडे दुर्लक्ष झाल्याने काम रखडले यामुळे परिसरातील विकासावर मोठा परिणाम होत असून रस्त्या अभावी बससेवा बंद आहे.मंजूरी व कार्यारंभ आदेश दिलेली कामे ठरावीक वेळेत पुर्ण करण्यासाठी संबधित विभागाने कारवाई करून कामे सुरू करण्याची मागणी राकाँचे सैय्यद आबीद अली यांनी पत्राद्वारे संबधित विभागाकडे केल्याची माहिती अली यांनी दिली असून त्वरित दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा गावकर्यांनी दिला आहे. #News34Chandrapur
