चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार म्हणजेच मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध धंदे, याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांचेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्यावर अवैध धंद्यांना आळा घालण्याची जबाबदारी देण्यात आली.
त्या अनुषंगाने बाळासाहेब खाडे यांनी क्लीन स्वीप मोहीम राबवली असता त्यामध्ये बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीत 2 अवैध दारूच्या कारवाया करीत तब्बल 21 लाख 50 हजारांचा अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला, चिमूर येथे सुगंधित तंबाखू साठा जप्त करीत 1 लाख 55 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारूच्या कारवाईत 2 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, भद्रावती येथील शेगाव रोड वर स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूची पेट्रोलिंग सुरू असताना त्या भागात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत तहसीलदार भद्रावती यांना सविस्तर माहिती देत कारवाई करण्यात आली ज्यामध्ये 7 लाख 3 हजार रुपयांचा दंड अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर ठोठावण्यात आला.
जिल्ह्यात एकूण 8 कारवाई मध्ये 32 लाख 90 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. #News34Chandrapur
या क्लीन स्वीप मोहिमेत जिल्हा पोलिस अधिक्षक साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे, सुरेश केमेकर, पंडित वऱ्हाडे, संजय आतकुलवार, धनराज करकाडे, नितीन रायपुरे आदींनी यशस्वी केली.
