घुगूस (पांढरकवडा) - चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना सुद्धा आज अवैध दारूचा महापूर, अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
पोलिसांच्या दुर्लक्षाने हे अवैध धंदे चांगलेच फोफावले आहे.
पांढरकवडा गावात मात्र अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असून याबाबत महिलांनी अनेकदा तक्रारी दिल्या मात्र कारवाई काही न झाल्याने महिलांनी अखेर त्या अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या.
या अवैध दारू विक्रीमुळे गावातील वातावरण खराब होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. #news34chandrapur
अवैध दारू विक्रेत्याला महिलांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले व त्याचे जवळ असलेली तब्बल 16 हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली.
गावातील महिलांनी एकजूट दाखवीत अवैध दारू विक्री प्रकरणी कारवाई केली, आमच्या गावातील दारू पूर्णपणे बंद करा अन्यथा आम्ही यासाठी जनआंदोलन करू असा इशारा महिलांनी दिला.
संतप्त महिलांनी यावेळी पोलीस निरीक्षक गांगुर्डे यांना पूर्णतः दारूबंदी करण्यासंदर्भात निवेदन दिले यावेळी ग्रामपंचायत सदस्य अर्चना गावंडे, नीला बरडे, बेबीनंदा निखाडे व समीर भिवापूर आदी उपस्थित होते.