चिमूर - चिमूर - तळोधी मार्गावर दोन दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू तर 4 गंभीर जखमी झाले.
ही घटना आज सायंकाळच्या सुमारास दहीकर विद्यालयाच्या समोर ही घटना घडली.
तळोधी नाईक निवासी 40 वर्षीय राजेश्वर कामडी या अपघातात मृत पावले. #News34Chandrapur
आठवडी बाजार आटोपून कामडी आपल्या मुलाच्या दुचाकीवर परत गावी यायला निघाले होते, परंतु याच वेळी समोर येणारी दुचाकी क्रमांक एमएच 34 एयु 8564 वर 27 वर्षीय दिनेश मुंडरे, अजिंक्य राऊत व सूरज जांभूळे हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा गेट वरून कवडसी रिसॉर्ट ला जात होते.
दहीकर विद्यालयासमोर दोन दुचाकी आपसात धडकल्या या धडकेत राजेश्वर कामडी यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा राहुल कामडी याची स्थिती नाजूक असल्याची माहिती आहे.
