चंद्रपूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने कोरपना येथील नारांडा रोडवर एका संशयित गळीची तपासणी केली असता गाडीमध्ये 194 देशी दारूच्या पेट्या मिळून आल्या गाडीसह दोन आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाही करण्यात आली आहे. #News34 Chandrapur
चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठवण्यासाठी एकीकडे समिती गठित करण्यात आली आहे दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असून सुद्धा जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांचा दारू साठा मोठ्या प्रमाणात येत आहे अशातच राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने कोरपना येथील नारंडा रोडवर दारू विरुद्धी कार्यवाही करत लेलँड वाहनातून 194 पेटी देशी दारू जप्त केले आहे वाहनासह सात लाख 94 हजार रुपयाची दारू असून या प्रकरणी वाहन चालकासह त्यांचा डोन साबेदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मागील काही महिन्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाणे दारू विरुद्ध मोहिम चालवली आहे दरम्यान कोरपना तालुक्यातील नारंडा मार्गाने एका वाहनातून दारू येत असल्याची माहिती त्याचा हाती लागली होती माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी केली असता या वाहनात देशी दारूच्या 194 पेट्या आढळून आल्या जिल्हाभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची दारू तस्करांवर करडी नजर असून विविध कारवायांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू तस्करांना चांगलेच धारेवर धरले आहे ही कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माननीय अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथक विभागाचे प्रभारी निरीक्षक अमित शिरसागर, चेतन अवचट, जगन पूट्टलवार, सुदर्शन राखुंडे, संदीप राठोड आदी कर्मचाऱ्यांनी पार पडली.
