चंद्रपूर - दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वेकोली वसाहत शक्तीनगर येथे 14 जानेवारीच्या मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास वसाहतीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करीत ATM मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
याबाबत पोलीस स्टेशन दुर्गापूर मध्ये तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास करीत शक्तीनगर वसाहतीमधील 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. Atm Machine durgapur
पोलिसांनी आरोपी मुलांकडून लोखंडी रॉड जप्त केला. पोलिसांनी आरोपीवर अप क्र.16/21 कलम 379, 511 भादवी पुढील तपास सुरू केला. News34 Chandrapur
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात पोउपनी प्रविण सोनोने
पोहवा सुनिल गौरकार, नापोशि उमेश वाघमारे, पोशि मनोहर जाधव, पोशि संतोष आडे, पोशि सुरज लाटकर यांनी यशस्वी केली.
