वरोरा - महाराष्टात सध्या ग्रामपंचायत निवडणूक ची धामधूम सुरू आहे.यातच चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बोर्डा ग्रामपंचायत अंतर्गत निवडणूक मतदान सुरू आहे.तिरंगी लढत असल्याने मतदारांचे मत जिंकण्यासाठी उमेदवाराची जणु चढाओढ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. News34 Chandrapur
यातच आपल्या समाजाची मते आपल्या उमेदवार ला मिळावा अशी जाती निहाय मत बांधणीसाठी प्रयत्न सुरू आहे.यातच आज बोर्डा ग्रामपंचायत चे माजी सरपंच भारत सोयाम हे आपल्या प्रभागातील परीचित लोकांसोबत चर्चा करीत असतांना बोर्डा निवासी एक प्रतिष्ठीत व्यक्तीने भारत सोयाम यांना "तु आमची मत हिसकावून राहिला"गोंडाळ्या तुला गडचिरोली च्या जंगलात फेकीन व जातीवाचक शिवी देत मारहाण केली.
सदर घटना घटली तेव्हा जवळच पोलिसांचा ताफा जात होता,पण पोलीसांनी बघ्याची भुमिका घेतली अशा आरोप पिडीत व्यक्तीने केला आहे.सदर निवडणूक दरम्यान आचारसंहिता, सुरू असताना हा प्रकार घडला आहे,सदर प्रकरणाची तक्रार वरोरा पोलीस स्टेशन ला करण्यात आली असुन आरोपीचा राजनैतिक संबंध प्रगढ असल्यामुळे त्याला असल्या प्रकरणाने काहीही फरक पडत नाही अशा आरोप ही नागरीकांनी केला आहे.आता सदर आरोपींवर फौजदारी कारवाई करण्यात येईल की नाही याकडे लक्ष वेधले जात आहे.
