गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना येथे २८ जानेवारी रोजी दुपारी १.३० वा.श्रीकृष्ण सभागृह येथे महिला मेळावा,मकरसंक्रांत उत्सव व आत्मनिर्भय महिला संमेलन आयोजित करण्यात आले असून कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार तर अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे उपस्थित राहणार आहे. जिल्हापरिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,माजी आमदार संजय धोटे,माजी आमदार सुदर्शन निमकर,भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कु.अल्काताई आत्राम,मनपा महापौर राखीताई कंचरलावार,भाजप महिला आघाडी अध्यक्षा(चंद्रपूर महानगर) अंजलीताई घोटेकर,भाजप प्रदेश सदस्य खुशाल बोंडे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहूले,भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे आदी मान्यवरांची प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. महिलांनी मोठ्यासंख्यने उपस्थित राहून सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोरपना शहर महिला आघाडीतर्फे करण्यात आले आहे.
