चंद्रपूर - 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी नागरिक उत्साहाने झेंडावंदन कार्यक्रम बघायला पोलीस मुख्यालयात येत असतात मात्र नागरिकांच्या या सुखद क्षणावर काही युवक विरजण घालण्याचं काम करतात.
असाच एक प्रकार 26 जानेवारीला नागपूर रोडवर घडला, एका दुचाकीस्वाराने जीवघेणा स्टंट करून एका नागरिकांच्या दुचाकीला धडक दिली, त्या धडकेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला ही घटना तर 26 जानेवारी ची आहे मात्र शहरात अनेक ठिकाणी युवक हे Stunt करीत असतात.
रामाला तलाव जवळ आजही सायंकाळ झाली की काही युवक मुलींना भुरळ पाडण्यासाठी असे जीवघेणे स्टंट करतात त्याचा परिणाम काही हो याचा त्यांना काही फरक पडत नाही.
सुसाट वाहन चालविणे, सायलेन्सर चा मोठा आवाज काढणे ह्या तर रोजच्या गोष्टी झाल्या मात्र पोलिसांनी या युवकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवायला हवी.
आज नागरीकांना पायदळ फिरणे सुद्धा कठीण झाले आहे, पालकवर्ग मुलांना स्पोर्ट्स बाईक घेऊन देतात नी यांचा उपडव्याप सूरू होतो, कमीतकमी पालकवर्गानी समजायला हवे कधी हे सुसाट स्टंट तुमच्या जीवावर ही बेतू शकतो.
तुकूम, दाताला रोड, शहरातील मुख्य मार्ग, जुनोना मार्गावर हे स्टंटधारी युवक सहज आढळून येतात.
नागरिकांनी सुद्धा आता खबरदारी घेणे गरजेचे आहे, पोलीस यायच्या आधी आपणच अश्या स्टंटधारी युवकांची तक्रार करायला हवी.
युवक तर युवक आता वयोवृद्ध सुद्धा हे Stunt करायला लागले आहे. यावर कुठेतरी नियंत्रण आणण्याची गरज आहे.
