चंद्रपूर - शिवसेना महिला आघाडी रामनगरतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकू व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजित कार्यक्रमात Shivsena महिला आघाडीच्या मनस्वी संदिप गिऱ्हे, रंगकर्मी डॉ. जयश्री कापसे, प्रीती घाटे, डॉ. मनीषा घुराल, सुवर्णा गुहे, डॉ. समता मडावी व कल्पना शिंदे आदी पाहुण्यांची उपस्थिती होती.
डॉ. जयश्री कापसे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की कोरोनाचा काळ हा महिलांसाठी अत्यंत कठीण परिस्थितीचा होता यावेळी महिलांनी घरची परिस्थिती उत्तमपणे हाताळली व पुढे हाताळणार आहेच.
कार्यक्रमाच्या आयोजिका मनस्वी संदिप गिऱ्हे यांनी उपस्थित महिलांना संबोधित करतांना म्हटले की कुठल्याही परिस्थितीत आज आपण सर्व संकटांचा सामना केला मात्र स्वतःसाठी कधी वेळ दिला नाही, मकरसंक्रांती निमित्त आपण आज एकत्र येत स्वतःच्या भावना एकमेकांसमोर मांडू शकत आहो, कठीण प्रसंगी आपण ठामपणे उभे राहिलो, हीच खरी महिलाशक्ती आहे.
कार्यक्रमात कोरोना योद्धांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली व स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरित करण्यात आले. News34
आयोजित कार्यक्रमात रामनगर परिसरातील असंख्य महिलांची उपस्थिती होती.
